धक्कादायक.... भर रस्त्यात
धक्कादायक.... भर रस्त्यात "तुफान" हाणामारी; एकमेकांचे कपडे फाडून घातला गोंधळ
img
Jayshri Rajesh
बीड जिल्यातील गेवराई - उमापूर रोडवर तृतीयपंथीयांचे दोन गट आमने-सामने आल्यानंतर तुफान हाणामारी झाली. भर रस्त्यावर झालेल्या या प्रकारात तृतीयपंथीयांनी एकमेकांचे कपडे फाडले. हा प्रकार अर्धा तासाहुन अधिक काळ सुरू होता. यामुळे रस्त्यावर बघ्यांची देखील मोठी गर्दी जमा झाली होती.

बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यावर थांबून तृतीयपंथीय पैसे मागतात यातूनच हा वाद झाला असावा असा अंदाज आहे, दरम्यान या प्रकाराची आता जोरदार चर्चा देखील होत आहे.

बीडच्या गेवराई तालुक्यातील उमापूर रस्त्यावर तृतीय पंथी खरे कोण खोटे कोण यावरून तूफान राडा पाहायला मिळाला. भर रस्त्यात तृतीयपंथांनी एकमेकाचे कपडे फाडले. यावेळी रस्त्याच्या बाजूने उभे राहिलेल्या लोकांनी यांना सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र तृतीयपंथी ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते.

तब्बल अर्धा ते एक तास चाललेल्या गोंधळामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती, यात दोन तृतीय पंथांना निवस्त्र करुन त्यांना रस्त्यावर बेदम मारहाण करण्यात आली. भर रस्त्यात गोंधळ घालणाऱ्या या तृतीयपंथ्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जाते आहे. तसेच या संपूर्ण घडलेल्या प्रकारामुळे संताप देखील व्यक्त केला जात आहे 
crime | Beed |
इतर बातम्या
Join Whatsapp Group