महाराष्ट्र लोकसभा निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
महाराष्ट्र लोकसभा निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
img
Dipali Ghadwaje
लोकसभा निवडणुकीच्या अनेक मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे काही उमेदवार विजयी झाले आहे. महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या निकालावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

राज्य सरकारने केलली कामं आणि मोदी सरकारने १० वर्षांत केलेल्या कामाची पोचपावती या विजयामध्ये मतदारांनी दिली आहे. असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका देखील केली.

'मोदी द्वेषाने पछाडलेले लोकं मोदींना तडीपार करण्याचे काम करत होते. जे तडीपाराची भाषा करत होते त्यांना जनतेने सत्तेपासून दूर ठेवून तडीपार केले आहे.', अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 'ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे मी आभार मानतो. महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना २ लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले आहे. मी मतदार आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे खूप अभिनंदन करतो. कारण त्यांनी खूप मेहनत घेतली.

ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. धर्मवीर आनंद दीघे यांचा बालेकिल्ला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे प्रेम असलेला ठाणे जिल्हा आहे. यामध्ये महायुतीचा भगवा झेंडा विजयाच्या रुपाने डौलाने फडकतोय. सर्वसामान्य कार्यकर्ता या मतदारसंघातून उमेदवार होता आणि सर्वांनी भरभरुन प्रतिसाद दिला आणि ठाण्याचा बालेकिल्ला आबादीत ठेवला.

तंसच, 'ठाण्यामध्ये विकासाला जनतेने मतदान केले. राज्य सरकारने केलेले काम आणि मोदी सरकारने १० वर्षांत केलेल्या कामाची पोचपावती या विजयाद्वारे मतदारांनी दिली आहे. ठाणेकरांनी त्यांची जागा त्यांना दाखवून दिली आहे. ठाकेकरांनी त्यांचे काम दाखवून दिले आहे. नरेश म्हस्के विजयी झाले त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. तसंच, नरेंद्र मोदी यांचेही अभिनंदन करतो कारण ते तिसऱ्यांना देशाचे पंतप्रधान होत आहेत. शिवसेना पक्ष एनडीएचा घटकपक्ष म्हणून त्यांच्यासोबत आहे. लवकरच एनडीएचे मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल. मोदी द्वेषाने पछाडलेले लोक मोदींना तडीपार करण्याचे काम करत होते. जे तडीपाराची भाषा करत होते त्यांना सत्तापासून दूर ठेवून तडीपार केले आहे. आमचा यापुढे विकासाचा अजेंडा असणार आहे. यादेशाने पुन्हा एकदा मोदींना पसंती दिली.

तसंच मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, 'खऱ्या शिवसेनेला पहिला खासदार ठाणेकरांनी दिला आहे. नरेश म्हस्के या लोकसभा मतदारसंघात विकासाचे कामं करतील. काही जागा अतिशय कमी मतांनी आमच्या गेल्या आहेत. काही ठिकाणी जागा जाहीर करायला उशिर झाला होता हे ही त्यामागचे कारण असू शकते. त्याची कारण मिमांसा आम्ही नक्की करू. त्यासोबत मघाशी म्हटल्याप्रमाणे जे काही संभ्रम आणि अपप्रचार करण्यामध्ये जे यशस्वी झाले आहेत. त्याचाही विचार आम्ही करू.' असे देखील त्यांनी सांगितले. त्याचसोबत, 'देशात इंडिया आघाडीचे सरकार होऊ शकत नाही. कारण बहुमत आम्हाला मिळाले आहे. एनडीए सरकार बनत आहे. भारतीय जनता पक्ष आणि इतर पक्षांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. खऱ्या अर्थाने ज्यांचा उद्देश होता मोदींना तडीपार करायचा त्यांना जनतेने तडीपार केले आहे.', असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group