मतदान प्रक्रियेदरम्यान राडा ! भाजप आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते भिडले
मतदान प्रक्रियेदरम्यान राडा ! भाजप आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते भिडले
img
वैष्णवी सांगळे
मतदान प्रक्रियेदरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये कोपरगाव येथे वादावादी झाल्याचं पहायला मिळालं. कोपरगावमध्ये सुरू असलेल्या मतदानादरम्यान एस. जी. महाविद्यालयातील मतदान केंद्रावर मोठा गोंधळ उडाला. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या समर्थकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. मतदारांवर उमेदवारांचे प्रतिनिधी प्रभाव टाकत असल्याचा आरोप दोन्ही गटांनी एकमेकांवर केला. 

मुख्य म्हणजे हा वाद पोलिसांसमोरच उफाळून आला. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्राच्या परिसरातून दूर हटवलं. या कारवाईदरम्यान मतदार प्रतिनिधी आणि पोलिसांमध्येही शाब्दिक चकमक झाली. 

या घटनेमुळे एस. जी. महाविद्यालयातील मतदान केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मतदान केंद्राच्या परिसरात भाजप आणि राष्ट्रवादीच्या समर्थकांची मोठी गर्दी जमली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासनाने सतर्कता वाढवली.कोपरगावमध्ये काळे आणि कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला लागल्याने मतदानाच्या दिवशी कार्यकर्त्यांमध्ये घमासान पहायला मिळालं. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group