नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजणार !  'या' दिवशी लागणार आचारसंहिता, समोर आली अपडेट
नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजणार ! 'या' दिवशी लागणार आचारसंहिता, समोर आली अपडेट
img
वैष्णवी सांगळे
महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे जोरदार वाहत आहे. मागील काही वर्षांपासून रखडलेल्या निवडणुका करण्याचा मार्ग सुप्रीम कोर्टाने मोकळा केला होता. त्यानंतर सगळ्याच राजकीय पक्षांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली. नगरपालिकांबाबत आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.



सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ च्या आतमध्ये महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश आयोगाला दिले. कोर्टाच्या आदेशानंतर आयोगाकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू कऱण्यात आली. पण निवडणुका लागणार कधी? हा मोठा प्रश्न होता. आता  निवडणुकीची संभाव्य तारीख समोर आली आहे. 




महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आहे. नगरपालिका निवडणुका डिसेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी पूर्ण होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोगाकडून नगरपालिका निवडणुकीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. येत्या १० नोव्हेंबरपूर्वी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. 

नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू शकते, असाही एक अंदाज आहे. जर अधिवेशानदरम्यान आचारसंहिता असेल तर सत्ताधाऱ्यांना एकही घोषणा करता येणार नाही. डिसेंबरअखेरपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होऊ शकते. 

राज्यात आचारसंहिता कधी?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल महाराष्ट्रात लवकरच वाजणार आहे. आयोगाकडून संपूर्ण आराखडा तयार करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन टप्प्यात या निवडणुका होऊ शकतात. येत्या १० नोव्हेंबरपूर्वी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या संदर्भातील अधिसूचना लवकरच जारी केली जाणार असल्याचं कळतंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात हालचींना वेग आलाय.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका होऊ शकतात. या निवडणुका हिवाळी अधिवेशनाच्या आधी होतील. तर दुसऱ्या टप्प्यात महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ शकतात. नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात लागणार लागण्याची शक्यता आहे. तर डिसेंबर अखेर महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group