२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी आजपासून अर्ज भरता येणार
२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी आजपासून अर्ज भरता येणार
img
वैष्णवी सांगळे
गेल्या काही वर्षणापासून प्रलंबित असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आणि जोरदार तयारीला अखेर सुरुवात झालीय.  राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून (10 नोव्हेंबर) सुरुवात होणार आहे. 



यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली असून १७ नोव्हेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असेल. राज्यातील २४६ नगरपरिषदेपैकी ३३ पदे अनुसूचित जातींसाठी व ११ पदे अनुसूचित जमातीसाठी आणि ६७ पदे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहेत. तर १३६ पदे खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.

नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी राज्यभरात सर्वच पक्षांकडून उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झाली आहे. मात्र अनेक भागात महायुती की महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवणार हे अद्याप स्पष्ट नाही. १७ नोव्हेंबरही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला निकाल आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group