मतदान यंत्रे ठेवलेल्या ठिकाणी चोख बंदोबस्त, राजकीय पक्षांनाही पाहरा ठेवण्याची मुभा
मतदान यंत्रे ठेवलेल्या ठिकाणी चोख बंदोबस्त, राजकीय पक्षांनाही पाहरा ठेवण्याची मुभा
img
वैष्णवी सांगळे
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील २६४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची येत्या २१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. तोवर मतदानयंत्रे ठेवलेल्या ठिकाणी सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवावा, गोदामांच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करावा असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

मतदान यंत्रांच्या सुरक्षितेतेसाठी कठोर उपाययोजना करण्याचे आदेशही आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मतदान यंत्र साठवणूक केलेल्या गोदामांच्या साठवणूक व व्यवस्थापनाकरिता जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. त्या ठिकाणी सीसीटिव्ही, सुरक्षा अलार्म यंत्रणा बसवावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. मुख्य म्हणजे या ठिकाणी राजकीय पक्षांना देखील जागता पाहरा ठेवता येईल.

मतदान यंत्र ठेवण्यात आलेल्या गोदामांच्या परिसरात २४ तास सशस्त्र चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करावी. साठवणुकीच्या ठिकाणी केवळ व अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश देण्यात यावा व अशा प्रवेशाचा तपशिल लॉगबुकमध्ये नोंदविण्यात यावा. राजकीय पक्षांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधींना मतदान यंत्रे ठेवलेली जागा व सुरक्षा व्यवस्थाबाबत माहिती देऊन आवश्यकतेप्रमाणे व त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना सुरक्षेबाबत पाहणी करण्याची मुभा द्यावी. 

तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार अथवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधींना मतदान यंत्रे ठेवलेल्या गोदामांचेप्रवेशद्वार दिसेल अशा ठिकाणी बसण्यासाठी जागा निश्चित करून द्यावी. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group