अजित पवार यांना मोठा धक्का, आमदार नरहरी झिरवाळ यांचे पुत्र शरद पवारांच्या मेळाळ्यात
अजित पवार यांना मोठा धक्का, आमदार नरहरी झिरवाळ यांचे पुत्र शरद पवारांच्या मेळाळ्यात
img
DB
राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला जोरदार झटका बसला होता. बारामतीची जागेवर पराभव स्विकारावा लागला आणि लोकसभेतही फार यश मिळाले नाही. आता अजित पवार यांना आणखी झटका बसला आहे. अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांचे पुत्र शरद पवार गटाच्या कार्यक्रमात दाखल झाले आहेत. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,  नाशिकमध्ये शरद पवार गटाची निष्ठावान सभा होती. या सभेला गोकुळ झिरवाळ यांनी हजेरी लावली आहे. दिंडोरीमधून गोकुळ झिरवाळ निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. झिरवाळ यांनी जयंत पाटील यांची भेटही घेतली आहे. या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group