“निवडणूक चिन्हांच्या यादीतून 'हे' चिन्ह वगळा अन्यथा…”, शरद पवार गटाचा निवडणूक आयोगाला इशारा
“निवडणूक चिन्हांच्या यादीतून 'हे' चिन्ह वगळा अन्यथा…”, शरद पवार गटाचा निवडणूक आयोगाला इशारा
img
Dipali Ghadwaje
लोकसभेत महाराष्ट्रातील मतदाते तुतारी आणि पिपाणीमध्ये साम्य असल्याने त्यांचा संभ्रम झाला. याचा फटका म्हणजे पिपाणीला दीड लाख मतं गेली असून साताऱ्याची सीट पडण्यास हे चिन्हंच कारणीभूत ठरल्याचा दावा, जयंत पाटील यांनी केला होता. महाराष्ट्र लोकसभा निवडणुकांमध्ये 'पिपाणी'मुळे 'तुतारी'चा खेळ बिघडल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या गोष्टीला दुजोरा दिला होता. 

त्यामुळे विधानसभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाला फटका बसू नयेयासाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय.  शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणुक आयोगाला पत्र देण्यात आलंय. फ्री सिम्बॉल मधून पिपाणी चिन्ह वगळण्याची विनंती या पत्राद्वारे करण्यात आलंय.

लोकसभेला पिपाणी चिन्हामुळे जो फटका बसला तो विधानसभेला बसू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दक्षता घेतली जातेय. फ्री सिम्बॉल मध्ये पिपाणी आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचा समावेश असल्यामुळे अडचणी येतं  असल्याचा पत्रात उल्लेख करण्यात आलाय. 

शरद पवार यांच्या पक्षाच्या दोन उमेदवारांचा पराभव झाला. त्यात रावेल मतदारसंघातून भाजपच्या रक्षा खडसे विरोधात श्रीराम पाटील तर दुसरे साताऱ्यातून श्रीकांत शिंदे पराभूत झालेत. साताऱ्याची सीट 45 हजारांनी पडली, यात 37 हजार मतं पिपाणीला गेली आहेत, असा दावा जयंत पाटील यांनी केलाय. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांचा पिपाणीमुळे गेम झाला अशी चर्चा आहे. 

लोकसभेत निवडणुकीत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाच चिन्ह होतं तुतारी वाजवणारा माणूस तर दुसरीकडे अनेक ठिकाणी अपक्षाला टॅम्पेट म्हणजे पिपाणी हे चिन्ह देण्यात आलं होतं. साताऱ्यात उदयनराजे भोसले यांनी शरद गटाच्या श्रीकांत शिंदे यांचा 32771 मतांनी पराभव केला. शरद पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. साताऱ्यात पिपाणी चिन्हावर अपक्ष संजय गाडे यांना 37062 मतं मिळाली. त्यामुळे तुतारी समजून मतदारांनी पिपाणीला मत दिलं असं बोलं जातंय. तरदुसरीकडे रावरमध्येही तिच स्थिती पाहिला मिळाली.

लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने 10 पैकी 8 जागांवर विजय मिळवला आहे. त्या जागांवरही पिपाणीचा प्रभाव बघायला  मिळाला, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. त्यामुळे विधानसभेत पिपाणी आणि तुतारीचा फटका शरद पवार गटाला बसू नये म्हणून पक्षात हालचालीला सुरुवात झाली आहे. 























इतर बातम्या
Join Whatsapp Group