गोपीनाथ मुंडेंच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री
गोपीनाथ मुंडेंच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री
img
Dipali Ghadwaje
राजकारणातून एक मोठी बातमी समोर  येत आहे.  भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या कन्या यशस्वी मुंडे या राजकीय मैदानात उतरल्या आहेत. बीडमधील परळी येथील वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक निवडणुकीच्या यशस्वी मुंडे यांनी संचालक पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यशस्वी यांच्यासोबत माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, यशश्री यांच्या उमेदवारीमुळे मुंडे घराण्याचा प्रभाव आणखी वाढण्याची चर्चा आहे.

पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्यानंतर आता यशस्वी मुंडे या देखील राजकारणात उतरल्या आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या यशश्रींसह माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे आणि एकूण ७१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. ही निवडणूक १७ जागांसाठी होत आहे.

१० ऑगस्टला मतदान आणि १२ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी १४ जुलैला होईल, तर १५ ते १९ जुलै दरम्यान अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.  

यशश्री मुंडे यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठित कॉर्नेल विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आहे. कॉर्नेल विद्यापीठात जगभरातील फक्त ११ टक्के विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळतो. यशश्री यांना 'प्रॉमिसिंग आशियाई स्टुडंट' म्हणून गौरवण्यात आले होते. त्यांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेय. यापूर्वी त्या राजकारणापासून दूर राहिल्या होत्या. मात्र, आता वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्या राजकीय मैदानात उतरल्या आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group