मोठी बातमी! महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर
मोठी बातमी! महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर
img
Dipali Ghadwaje
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानुसार १२जुलै रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी मजमोजणीही पार पडेल. विधानसभाआमदारांनी निवडून दिलेल्या विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ येत्या २७ जुलै रोजी संपत असल्यानं ही  निवडणूक जाहीर झाली आहे.


कुठले सदस्य होताहेत निवृत्त?

डॉ. मनिषा कायंदे
विजय गिरकर
अब्दुल्ला खान दुरानी
निलय नाईक
अॅड. अनिल परब
रमेश पाटील
रामराव पाटील
डॉ. वजहत मिर्झा
डॉ. प्रज्ञा सातव
महादेव जानकर
जयंत पाटील
 
निवडणुकीचा असा असेल कार्यक्रम

नोटिफिकेशन - मंगळवार, २५ जून २०२४ 
अर्ज भरण्याची शेवटची तारीख - मंगळवार, २ जुलै २०२४
उमेदवारी अर्जांची छाननी - बुधवार, ३ जुलै २०२४
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख - शुक्रवार, ५ जुलै २०२४
निवडणूक दिनांक - शुक्रवार १२ जुलै २०२४
मतदानाची वेळ - सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत
मतमोजणी - शुक्रवार, १२ जुलै २०२४. संध्याकाळी ५ वाजता.
निवडणूक कार्यक्रम पूर्ण होण्याचा दिनांक - मंगळवार, १६ जुलै २०२४
इतर बातम्या
Join Whatsapp Group