गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. येत्या काही तासात देशात कुणाची सत्ता येणार? याचे चित्र स्पष्ट होणार आहे. तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार रुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांच्यात प्रमुख लढत होत आहे.
मात्र भास्कर भगरे यांच्या नावात साम्य असलेल्या उमेदवाराला तब्बल २६ हजार मते मिळाली आहेत. यामुळे भास्कर भगरेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बाबू सदू भगरे सरांना चक्क २६ हजार ३३३ मते
दिंडोरीत महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे हे सहाव्या फेरी अखेर १५ हजार ५४० मतांनी आघाडीवर आहेत. मात्र आडनावात साम्य असलेले उमेदवार बाबू सदू भगरे सरांना चक्क २६ हजार ३३३ मते मिळाली आहेत. दिंडोरीत एकच आडनाव आसलेल्या उमेदवारामुळे नाट्यमय वळण मिळण्याची शक्यता आहे. निकलाअंती महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांना फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.