लोकसभा निवडणूक : राज्यातील टॉप ५ लढतीत कोण पुढे? कोण मागे? जाणून घ्या

img
Dipali Ghadwaje
राज्यातील लोकसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. प्रत्येक फेरीत बदलणारी स्थिती, आघाडी पिछाडीचा खेळ अन् क्षणात फिरणाऱ्या आकड्यांमुळे कार्यकर्त्यांसह, उमेदवारांचीही धाकधुक वाढत आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकांचा पहिला कल समोर आला आहे. 

राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती, सातारा, माढा, सांगली, शिरुर या महत्वाच्या मतदार संघात कोणी आघाडी घेतली? कोण पिछाडीवर आहे? जाणून घ्या

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. सुरूवातीच्या कलांमध्ये सुप्रिया सुळे यांनी जोरदार आघाडी घेतली होती. मात्र शिवतारेंच्या पुरंदर विधानसभेतील मतमोजणीत सुनेत्रा पवार यांनी आघाडी घेतली होती. 

त्यानंतर पुन्हा सुप्रिया सुळे आघाडीवर आल्याचे दिसत आहे. शिरुरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी सुरूवातीपासून आघाडी घेतल्याचे कल समोर आले आहेत. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना जोरदार टक्कर दिली असून पोस्टल मतदानासह तिस-या फे-यांमध्ये ते आघाडीवर आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group