"........म्हणून मतदार मतदान न करता फिरले माघारी" ; नेमकं काय घडलं?
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):-मतदान केंद्रावर मोबाईल बंदी केल्याने अनेक मतदारांनी नाराजी व्यक्त करीत मतदान न करता माघारी फिरले. या मुळे मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता आहे.

  निवडणूक केंद्रा वर मोबाईल बंदी केली आहे.ही माहिती नसल्याने अनेक मतदार प्रचंड उकाडा असून ही केंद्रवर मतदार गेल्यावर पोलिसांनी मोबाईल केंद्रा मध्ये नेण्यासाठी मज्जाव केल्याने मतदारांनी मोबाईल कुठे ठेवावा,असा प्रश्न निर्माण झाल्याने मतदारानी मोबाईल साठी मतदान न करता माघारी फिरले.

मात्र जे सह परिवार मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांनी एकमेकांचे मोबाईल सांभाळून मतदानचा हक्क बजवाला तर अनेकांनी मोबाईल सायलेंट व बंद करून पोलिसांना तुरी देऊन मोबाईल केंद्रात घेऊन गेले व मतदान करून आले. मात्र अनेक मतदारांना मोबाईल मुळे मतदान न करताआल्यामुळे मतदानचा टक्का घसरण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या
नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group