लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यातील मतदान ०१ जून रोजी होणार आहे. तर, ०४ जून रोजी मतमोजणी आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मिळणाऱ्या जागांबाबत विविध दावे केले जात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले हे वक्तव्य चर्चेत आले आहे. अजित पवार यांनी केलेल्या विधानावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
लोकसभा निवडणुकीत काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही आम्ही ज्यावेळी महाविकास आघाडीत एकत्र काम करायचो. तेव्हा आम्हाला सांगायचे की, शिवसेनेबाबत टोकाची भूमिका घ्या. काय कुठे कसे गणित बदले.
लोकसभा निवडणुकीत काय होईल, हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. आगामी काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राजकीय पक्ष आतापासूनच विधानसभेच्या तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत अजित पवार बोलत होते.