सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी
सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी
img
चंद्रशेखर गोसावी
नाशिक - पक्ष विरोधी कारवाई केल्यामुळे शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांनी दिली.

मागील दोन दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील राजकारणामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणून चर्चेत असणारे शिवसेनेचे उपनेते आणि माजी जिल्हाप्रमुख, माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते.

त्या वेळेपासून ते पक्ष सोडणार अशा स्वरूपाच्या चर्चा सुरु होत्या. यासंदर्भामध्ये पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी म्हणून शिवसेना कार्यालयात जिल्हा प्रमुख डी.जी. सूर्यवंशी, महानगर प्रमुख विलास शिंदे, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, उपनेते सुनील बागुल, माजी महापौर विनायक पांडे, यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

पत्रकार परिषद सुरू असताना सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांच्या मोबाईलवर मुंबईवरून खा. संजय राऊत यांनी फोन करून पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकलपट्टी करण्यात आल्याची माहिती दिली आणि त्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group