4 जूनला महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार?
4 जूनला महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार?
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पूर्ण झाले असून, आता सर्वांच्या नजरा 4 जूनकडे लागल्या आहेत. कारण चार जूनला लोकसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. याचबरोबर निकालानंतर पुढे काय? हे ठरवण्यासाठी महायुती, महाआघाडीतील पक्ष आपआपल्या महत्त्वांच्या नेत्यांबरोबर बैठकांवर बैठका घेत आहेत. 

दरम्यान महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीत गेल्या दोन वर्षांमध्ये मोठा बदल झाला आहे. या काळात पहिल्यांदा शिवसेना फुटली. भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देत उद्धव ठाकरे यांना जबरदस्त धक्का दिला. 

यानंतर गेल्या वर्षी शिवसेना फोडूनही लोकसभेबाबत खात्री नसल्याने भाजपने राष्ट्रवादीही फोडली असे आरोप केले जातात. त्यामुळे या निवडणुकीत महायुती जास्त जागा जिंकत वर्चस्व गाजवणार की पक्ष फुटूनही शरद पवार आणि उद्धव ठाकरे जास्त जागा जिंकत भरारी घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group