शांतीगिरी महाराज कार्यकर्त्यांविरोधात पंचवटी व सिडकोत गुन्हा दाखल
शांतीगिरी महाराज कार्यकर्त्यांविरोधात पंचवटी व सिडकोत गुन्हा दाखल
img
चंद्रशेखर गोसावी
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- मतदान केंद्राच्या आवारामध्ये निशाणी आणि नावाच्या चिठ्ठ्या वाटप करण्यावरून अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्या तीन कार्यकर्त्यांच्या विरोधात पंचवटी व अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले आहेत.

पंचवटी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एकलव्य निवासी आश्रमशाळा या मतदान केंद्रामध्ये दुपारच्या सुमारास अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांचे समर्थक शिवम्‌‍ संजय दाभाडे, विजय सुभाष दाभाडे व अजय सुभाष दाभाडे हे शांतीगिरी महाराज यांची बादली ही निशाणी असलेली त्यांचे नाव असलेल्या चिठ्ठ्या मतदान केंद्रापासून 100 मीटर परिसराच्या आतमध्ये वाटप करत असताना आढळून आले.

यापूर्वीही त्यांना समज देण्यात आली होती; परंतु त्यांनी पोलिसांनी दिलेल्या या सूचनेकडे दुर्लक्ष केले आणि त्यानंतर पुन्हा ते मतदान केंद्र परिसरात फिरताना आढळल्यामुळे त्यांच्या विरोधात पोलीस हवालदार अनिल गुंबाडे यांनी गुन्हा दाखल केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group