"या" कारणामुळे 11 बुलेटच्या पैजेचा विडा 'रंगला'च नाही; माढ्याच्या पाटलांची ऐनवेळी माघार ; नेमकं कारण काय?
img
Dipali Ghadwaje
लोकसभेच्या रणधुमाळीत यंदा माढा लोकसभा मतदार संघ चांगलाच चर्चेत आला होता.माढा लोकभा मतदार संघात यावेळी भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकर विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात चुरशीने लढत झाली. या निवडणुकीत विजयाचा गुलाल कोण उधळणार? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगल्या आहेत. 

अशातच माढा तालुक्यातील बावी येथील मोहिते पाटील समर्थक निलेश पाटील यांनी माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील हेच विजयी होणार असा दावा करत ११ बुलेट गाड्याची पैज जाहीर केली होती. तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे समर्थक अनुप शहांनी पाटील यांचे चॅलेज स्विकारात पैजेचा विडा उचलण्यासाठी पुढे आले होते.

मात्र आता 11 बुलेट गाड्यांची पैज लावणारे मोहिते पाटील समर्थक निलेश पाटील यांनी अखेर माघार घेतली आहे. तर भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर समर्थक अनुप शहा मात्र आजही पैज लावण्यावर ठाम आहेत. कायद्याच्या धाकामुळे आपण पैजेतून माघार घेतल्याचे निलेश पाटील यांनी म्हटले आहे, तर पैजाचा विडा उचलणाऱ्या फलटणच्या अनुप शहा यांनी मात्र होऊ दे गुन्हा मी पैज लावण्यास तयार असल्याची ठाम भूमिका घेतली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group