दिंडोरीत पेटला कांदा; राजकीय पक्षांसह शेतकऱ्यांनी केले आंदोलन
दिंडोरीत पेटला कांदा; राजकीय पक्षांसह शेतकऱ्यांनी केले आंदोलन
img
Dipali Ghadwaje
दिंडोरी :- लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या काळात दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कांद्याचा प्रश्न हा चांगलाच पेटला आहे. त्यामुळे मतदान सुरू असतानाही निफाड, चांदवड आणि सटाणा या ठिकाणी शेतकरीनी मतदानाला जाण्यापूर्वी आंदोलन केले.

नाशिक जिल्ह्यातील अतिशय महत्त्वपूर्ण असे पीक असलेले कांदा या पिकावर निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने निर्यात बंदी लावली. त्यापूर्वी निर्यात शुल्क हे 40 टक्के केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अतिशय संताप व्यक्त केला जात होता. त्यानंतर कांदा प्रश्नावरून व्यापारी आणि आम्हाला असोसिएशन यांच्यातही वाद सुरू झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा हा अतिशय कवडीमोल भावात विकावा लागला. परत निर्यात बंदी सुरू झाली आणि निर्यात शुल्क कायम ठेवले. त्यामुळे शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना अतिशय त्रास सहन करावा लागला. त्याचा राग नाशिक मध्ये खास करून दिंडोरी लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाच्या वेळी दिसून येत आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान चालू असताना 10 वाजेच्या सुमारास चांदवड तालुक्यातील  वडगाव पंगु येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सुभाष कचरू
गोजरे,  अरुण जगन गोजरे, प्रहार संघटनेचे शंकर निवृत्ती गोजरे, मयूर वाळूबा गोजरे, किशोर राजेंद्र गोजरे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे गणेश शिवाजी शिरसाठ, राजेंद्र प्रभाकर गोजरे या कार्यकर्त्यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदान करण्यासाठी मतदान केंद्र मध्ये जात असताना चांदवड पालिसांनी त्यांना समजावून सांगितले. यावेळी हे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. पण पोलिसांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये या कार्यकर्त्यांना कांद्याच्या माळा या बाहेरच काढाव्या लागतील असे सांगून त्यांना प्रवेश दिला.

सटाणा येथे माजी आमदार दीपिका चव्हाण आणि संजय चव्हाण हे आपल्या कार्यकर्ते व परिवारासह मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर जाताना कांद्याच्या माळा गळ्यात घालून तिथे पोहोचले. त्या ठिकाणी त्यांनी हे अनोखे आंदोलन केले. त्यांनाही पोलिसांनी मतदान केंद्राच्या बाहेर अडवून कांद्याच्या माळा काढायला लावल्या आणि त्यानंतर या दोन्हीही माजी आमदारांनी मतदान केले.

निफाड तालुक्यातही काही गावांमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा तसेच कांदे घेऊन मतदान केंद्रामध्ये जाण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या ठिकाणीही पोलिसांनी त्यांना अडविले आणि कांदे बाहेर ठेवायला लावले आणि मगच त्यांचे मतदान करावयास सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group