निकालाआधीच इंडिया आघाडीच्या  सरकार स्थापन्यासाठी हालचाली सुरु
निकालाआधीच इंडिया आघाडीच्या सरकार स्थापन्यासाठी हालचाली सुरु
img
DB
नवी दिल्ली : देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी सुरु झाली आहे. मतमोजणीचे कल समोर आले आहेत. देसभरात सर्व मतदारसंघाच्या मतमोजणीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी २९५ जागांवर आघाडीवर आहे. तर २३० जांगावर इंडिया आघाडीवर आहे. लोकसभेचा निकाल जाहीर होण्याआधीच इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सरकार स्थापन्यासाठी हालचाली सुरु केल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसभा निकाल जाहीर होण्याआधीच इंडिया आघाडीने सरकार स्थापन्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. काँग्रेस पक्षातील नेत्यांकडून सरकार स्थापन्यासाठी डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. 

काँग्रेस पक्षातील नेते एनडीएमधील घटक पक्षांसोबत संवाद साधणार आहे. तसेच आंध्र प्रदेशातील टीडीपी आणि बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयूसोबत संवाद साधणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group