अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आज दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही लोकसभेत मोठा गोंधळ झाला. भारत-चीन वादाचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून गोंधळ घालण्यास सुरूवात झाली. त्यानंतर काँग्रेसच्या काही खासदारांनी पीठासन सभापतींच्या दिशेने कागद भिरकावले. त्यामुळे पीठासन सभापतींनी काँग्रेसच्या सात आणि माकपच्या एका खासदाराला अधिवेशनाच्या कार्यकाळापर्यंत निलंबित केलं.
कुणाला निलंबित करण्यात आलं?
१ हिबी ईडन
२ अमरिंदर सिंह राजा वारिंग
३ गुरदीप सिंह औजला
४ प्रशांत पडोले
५ मणिकम टागोर
६. किरण कुमार रेड्डी
७ डीन कुरियाकोस
८ एस वेंकटेशन - माकपा
आठ खासदारांना निलंबित करण्याच्या निर्णयाच्या विरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी विरोध केला. त्यांनी या निर्णयाविरोधात संसदेच्या परिसरात आंदोलन सुरू केल्याचं दिसून आलं.