आज गंगा सप्तमी आणि नक्षत्रराज पुष्य असा योगायोग आहे. या रवियोगाने ग्रहांची चांगली स्थिती निर्माण होत आहे. असे मानले जाते की या दिवशी कोणतेही काम केल्याने इच्छित मनोकामना पूर्ण होतात. पुष्य नक्षत्रात कोणतेही काम केल्यास त्याची पूर्णता निश्चित मानली जाते.
या विशेष योगायोगानेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सलग तिसऱ्यांदा वाराणसीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आज दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत पंतप्रधानांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
लोकसभा निवडणुकीसाठी वाराणसीत 1 जून रोजी शेवटच्या आणि सातव्या टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी दाखल करण्यापूर्वी वाराणसी येथील काशी कोतवाल बाबा काल भैरव मंदिरात पूजा केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 12 राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित होते.