ठरलं! रायबरेलीतून राहुल गांधी, तर अमेठीतून
ठरलं! रायबरेलीतून राहुल गांधी, तर अमेठीतून
img
Dipali Ghadwaje
नवी दिल्ली : काँग्रेसने अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आई सोनिया यांच्या रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसने त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. प्रियांका गांधी निवडणूक लढवणार नाहीत. तर अमेठीतून किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख ३ मे आहे. त्यामुळे काँग्रेस या दोन मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यास वेळ केला हे स्पष्ट आहे. मात्र, आज दोन्ही उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर आजच उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल. काँग्रेसकडून याची अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे.  

अमेठी आणि रायबरेलीमध्ये २० मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. काँग्रेसने राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी पूर्ण केली असून यावेळी सोनिया गांधीदेखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.


रायबरेली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी निवडणूक लढवतात. पण, त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्या राज्यसभेच्या माध्यमातून संसदेत गेल्या आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांना रायबरेलीमधून मैदानात उभे करण्यात आले आहे.

भाजपाने अमेठी आणि रायबरेली या दोन्ही जाागांसाठी उमेदवारांची घोषणा केली असून अमेठीतून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना तर रायबरेलीतून दिनेश प्रताप सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group