मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय गायकवाड यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावरुन संजय गायकवाड यांनी संताप व्यक्त करत वादग्रस्त वक्तव्य केलं. “जो राहुल गांधीची जीभ छाटेल त्याला ११ लाखांचे बक्षीस देणार”, असं संजय गायकवाड म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरुन राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. “
आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्या राहुल गांधींवर आक्षेपार्ह भाषेत संजय गायकवाडांनी टीका केलीय. आरक्षणाची भाषा संपवणाऱ्यांचं मनातील ओढावर आल्याचंही गायकवाड म्हणालेत. राहुल गांधी यांना मागासवर्गीय , आदिवासी सह इतरांचे शंभर टक्के आरक्षण संपवायचे आहे, काँग्रेसचा खरा चेहरा आणि पोटातील मळमळ बाहेर आली, असं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे. त्यांच्या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसात उमटण्याची शक्यता आहे.
राहुल गांधींबद्दल वादग्रस्त विधान करणा-या संजय गायकवाडांविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झालेत. सत्तेमुळे हिंसेची व्यवस्था निर्माण झालीय. भाजपनं संजय गायकवाडांवर सुमोटो कारवाई अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीय. तर मोदींबद्दल असं विधान केलं असतं तर जी कारवाई केली असती, तीच करावाई संजय गायकवाड करण्याची मागणी अंबादास दानवेंनी केलीय.