'माझा फोन टॅप होतोय, पुरावे मोबाईलमध्येच'; राहुल गांधींच्या विधानाने खळबळ
'माझा फोन टॅप होतोय, पुरावे मोबाईलमध्येच'; राहुल गांधींच्या विधानाने खळबळ
img
Nandini khandare More

राजकारणात आता पुन्हा एकदा एक मोठी आणि खळबळजनक घडामोड घडली आहे. काँग्रेस खासदार, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सर्वात मोठा आरोप केला आहे. माझा फोन टॅप केला जातोय, असा आरोप राहुल गांधी यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी फोन टॅपिंग वरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत सरकारवर आरोप केला आहे.

राहुल गांधी यांनी आरोप करताना म्हटलं की, मी केलेल्या आरोपांचे पुरावे माझ्या फोनमध्ये आहेत. या फोनला पंतप्रधान मोदी टॅप करत आहेत. समोरासमोर चर्चा केल्यानंतर स्पष्ट होईल की, परकीय देशांच्या इशाऱ्यांवर कोण काम करत आहे. तसेच कोण किती देशद्रोही आणि किती काळापासून देशद्रोहाच्या कामात सामील आहे, हे समजेल. मला ज्ञात असलेली बरीच माहिती माझ्या फोनमध्ये आहे’.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समोरासमोर चर्चेच आव्हान दिले.  समोरासमोर चर्चा केली, तर नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदावर राहणार नाहीत’, असा टोा राहुल गांधींनी लगावला. तर राहुल गांधी यांना विचारण्यात आले की, भाजप संसदेत चर्चेसाठी तयार असताना, त्यांना सार्वजनिक ठिकाणी चर्चेचा आग्रह का करत आहात, त्यावर ते म्हणाले, मला लोकसभेत बोलू दिले जात नाही. माझा माईक बंद करण्यात येतो’.


राहुल गांधी यांनी यावेळी अनेक गंभीर आरोप केले. राहुल गांधी यांनी म्हटलं की, कृषि कायदे, मत चोरी, एसआयआर , चीन, जनरल नरवणे यांचं पुस्तक, एपस्टिन फाइल या प्रकरणावर बोलू दिले जात नाही. आम्हाल लांबलचक भाषणे नकोत. आम्हाला थेट उत्तरे हवीत. ज्यात दोन्ही नेत्यांची समोरासमोर चर्चा होईल’. राहुल यांनी पुढे म्हणलं की,  पंतप्रधान मोदी हे एका बाजुला, तर दुसऱ्या बाजुला मला जागा हवीय. म्हणजे दोन्ही नेत्यांमध्ये समोरासमोर चर्चा होईल. चर्चेदरम्यान गौतम अदानी किंवा आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना जज ठेवलं तरी मला आक्षेप नाही’.

इतर बातम्या
Join Whatsapp Group