राहुल गांधी भिवंडी कोर्टात, प्रकरण नेमकं काय ?
राहुल गांधी भिवंडी कोर्टात, प्रकरण नेमकं काय ?
img
वैष्णवी सांगळे
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याविरोधात भिवंडी कोर्टात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. २०१४ मध्ये राहुल गांधी यांनी आरएसएसशी सबंधित केलेल्या एका विधाना प्रकरणी दाखल मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी आज भिवंडी कोर्टात हजर झाले. दरम्यान याप्रकरणात आज (शनिवारी) भिवंडी कोर्टाने गांधी यांना या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे.

खासदार राहुल गांधी हे २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक प्रचारासाठी भिवंडीत आले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी एक वादग्रस्त विधान केले होते. महात्मा गांधी यांची हत्या आणि आरएसएस यांच्या संबंधित ही टिप्पणी होती. त्याविरोधात संघाचे स्वयंसेवक राजेश कुंटे यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता. यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर हे त्यांचे जामीनदार होते. पण चाकुरकर यांच्या निधनामुळे आता नवीन जामीनदार द्यावा लागणार आहे.

दरम्यान, भिवंडी कोर्टात राहुल गांधींचे नवे जामीनदार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहे. दिवंगत शिवराज पाटील चाकुरकरानंतर हर्षवर्धन सपकाळ नवे जामीनदार असतील. सुरक्षेच्या कारणास्तव भिवंडी कोर्ट परिसरात पोलीसांकडून कसून तपासणी करण्यात आली. तर काल एआय समिटमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर भाजप संतप्त आहे. त्यातच राहुल गांधी हे आज ठाण्यात दाखल झाल्यानंतर भारतीय जनता युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले आणि घोषणा दिल्या.
इतर बातम्या
Join Whatsapp Group