लोकसभा निवडणुकीच्या तारखा 'या' दिवशी जाहीर होणार?  निवडणूक आयोगाच्या हालचालींना वेग
लोकसभा निवडणुकीच्या तारखा 'या' दिवशी जाहीर होणार? निवडणूक आयोगाच्या हालचालींना वेग
img
Dipali Ghadwaje
आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी केली असून त्या दृष्टीने आपापल्या रणनीती आखल्या जात आहेत. अशातच लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखांबाबत मोठी अपडेट समोर आली.निवडणूक आयोग लवकरच सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करू शकते.

निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाचे अधिकारी देशातील अनेक राज्यांना भेटी देत ​​आहेत. दरम्यान, 13 मार्चनंतर लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात, अशी बातमी समोर येत आहे. 7-8 टप्प्यात मतदान होऊ शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.  

एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोग 13 मार्चनंतर लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करू शकते. देशातील निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचे पथक राज्यांच्या दौऱ्यावर आहे. तसेच कोणत्या राज्यात किती टप्प्यात आणि कशा पद्धतीने निवडणूक प्रक्रियाचे नियोजन करता येईल, याचा आढावाही त्यांच्याकडून घेतला जात आहे.  

सध्या निवडणूक अधिकाऱ्यांची टीम तामिळनाडूमध्ये आहे. त्यानंतर ते उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 13 मार्चपूर्वी राज्याचे दौरे पूर्ण होणार असल्याचा दावा एका वृत्त संस्थेच्या बातमीत करण्यात आला आहे. अशातच 13 मार्च रोजी किंवा त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group