महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. इच्छुक देखील या निवडणुकांसाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे आता मतदारांनी निवडणुकांसाठी सज्ज होऊन कटाक्षाने मतदान करावे हे अपेक्षित आहेत. कारण अनेक वर्षांपासून या निवडणूक खोळंबल्या आहेत. मात्र १ जुलै २०२५ नंतर मतदारयादीत नाव नोंदणी करणाऱ्यांना मद्दानापासून वंचित रहावे लागणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून दिली जाणारी मतदारयादी महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी वापरली जाणार आहे. १ जुलै २०२५ रोजी अंतिम करण्यात आलेली ही यादी ग्राह्य धरली जाणार असून, त्यानंतर नावनोंदणी केलेल्या मतदारांना महापालिका निवडणुकीत मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘महापालिकेच्या यापूर्वीच्या निवडणुकीत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मतदारांची यादी घेऊन प्रभागनिहाय, मतदान केंद्रनिहाय या यादीची फोड केली जात होती. मात्र, या वेळी स्थानिक पातळीवरून मतदारयादी घेऊ नये, निवडणुकीसाठी केवळ आयोगाकडून देण्यात आलेली मतदारयादी ग्राह्य धरावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून यादी घेतली जाणार नाही.
दरम्यान, महापालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचनेला मान्यता देण्यात आली असून, पुढील काही दिवसांत प्रभागनिहाय आरक्षण जाहीर होणार आहे. त्यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.