सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. केंद्रीय निवडणूक आयोग आज विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी ३ वाजता दिल्लीमध्ये महत्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्रीय निवडणूक आयोग नेमकी कोणत्या राज्याच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जातात हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही. मात्र, जम्मू-कश्मीर, झारखंड, हरियाणा या राज्यांबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचीही घोषणाही होणार का? याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीबाबत देखील निवडणूक आयोग काय निर्णय घेतं? हे आज दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतरच स्पष्ट होईल.