अखेरच्या क्षणी शरद पवारांनी डाव फिरवला? राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग...
अखेरच्या क्षणी शरद पवारांनी डाव फिरवला? राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग...
img
Dipali Ghadwaje
विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला आता अवघे काही तास शिल्लक राहीले आहेत, आज प्रचाराच्या तोफा थंडावतील. येत्या वीस नोव्हेंबरला बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आहे. तर तेवीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे.

दरम्यान 2019 नंतर राज्यात दोन बड्या पक्षात फूट पडली. या फुटीनंतर राज्यात प्रथमच विधानसभेची निवडणूक होत असल्यानं या निवडणुकीकडे राज्याचं नाही तर देशाचं लक्ष लागलं आहे. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार की महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान बंडखोर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यानं महाविकास आघाडी आणि महायुतीमधल्या अधिकृत उमेदवारांचं टेन्शन वाढलं आहे. त्यातच मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे काही तास शिल्लक असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना मोहोळमधील बंडखोरी मोडून काढण्यात यश आलं आहे.

मोहोळ विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजू खरे यांना बंडखोर उमेदवार संजय क्षीरसागर यांनी पाठिंबा दिला आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी संजय क्षीरसागर यांनी आपला पाठिंबा जाहीर केला. संजय क्षीरसागर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी न दिल्याने ते नाराज होते. त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र आता त्यांनी राजू खरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता मोहोळमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकत वाढली आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group