बिबट्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी 'या' आमदाराची विधानभवनात थेट बिबट्याच्या वेशात एंट्री
बिबट्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी 'या' आमदाराची विधानभवनात थेट बिबट्याच्या वेशात एंट्री
img
वैष्णवी सांगळे
रात्री बेरात्री बाहेर फिरताना चोरांचे , गुंडांचे दर्शन होण्याची भीती आपल्याला वाटते मात्र गेल्या काही वर्षपासून यामध्ये बिबट्याची देखील भर पडली आहे. महाराष्ट्रात जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरुरच नाही तर अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातही बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातलाय.

बिबट्याच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले असून यात अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशन सुरू असताना विधान भवनातच शिंदेसेनेचे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी थेट बिबट्याच्या वेशातच एंट्री मारली. 

आमदार शरद सोनवणे बिबट्याच्या वेशात थेट विधानसभेत पोहोचले तेव्हा मात्र तालिका अध्यक्षांनी शरद सोनवणेंना चांगलंच सुनावलंय. वनमंत्र्यांनी बिबट्यांना १ कोटीच्या बकऱ्यांची मेजवानी देण्याचा सल्ला आमदार सोनवणेंनी केवळ धुडकावूनच लावला नाही तर बिबट्यांच्या जन्मदरावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनोखा सल्ला दिलाय.

बिबट्यांच्या वाढत्या संख्येला पायबंद घालण्यासाठी बिबट्यांची नसबंदी, रेस्क्यू सेंटर्सचा उपाय महत्वाचा मानला जातो. मात्र सरकार बिबट्यांवर वैज्ञानिक तोडगे काढण्याऐवजी त्यांना मेजवानी देण्याचा घाट घालतंय. मुळात बिबट्यांना आळा घालण्यासाठी उपायांची तातडीनं अंमलबजावणी करणार की केवळ चर्चांचं गुऱ्हाळ रंगणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय.


इतर बातम्या
Join Whatsapp Group