भाजप आमदार पाटणी यांचे निधन
भाजप आमदार पाटणी यांचे निधन
img
Dipali Ghadwaje
लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्यानंतर भाजपने आणखी एक आमदार गमावला. भाजपचे कारंजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांची प्राणज्योत शुक्रवारी (23 फेब्रुवारी) मालवली. ते ५९ वर्षाचे होते.

वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचे दीर्घ आजारामुळे आज निधन झालं. ५९ वर्षीय राजेंद्र पाटणी हे गेल्या दोन-तीन वर्षांपासून आजारी असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली.  

सकाळी आमदार राजेंद्र पाटणी यांचे मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या दोनही किडण्या फेल झाल्या होत्या. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ते आजाराने त्रस्त होते. ते आधी आधी शिवसेनेत होते. त्यांची भाजपमध्ये सेंकड टर्म होती.
 
दरम्यान आमदार राजेंद्र पाटणी यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट लिहून श्रध्दांजली अर्पण केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट

"अत्यंत दुःखद बातमी: विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणीजी यांचे आज निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील, अशी आम्हा सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली. ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपाने गमावला आहे. पश्चिम विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, म्हणून ते सतत आग्रही असायचे. त्यांचे निधन ही माझी वैयक्तिक हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबीयांना मिळावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ॐ शांती"



इतर बातम्या
Join Whatsapp Group