मोठी बातमी : घरवापसी होताच एकनाथ खडसेंना मिळणार
मोठी बातमी : घरवापसी होताच एकनाथ खडसेंना मिळणार
img
Dipali Ghadwaje
विधानसभेआधी भाजपमध्ये मोठ्या हालचाली, एकनाथ खडसेंकडे लवकरच मोठी जबाबदारी मिळणार आहे. भारतीय जनता पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलीय. विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने रोडमॅड ठरवला आहे. याचपार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश लवकरच केला जाणार आहे.

लोकसभेच्या पराभवानंतर भाजप विधानसभेच्या तयारीला लागलीय. त्यापार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या हालचाली होत आहेत. मंगळवारी दिल्लीत झालेल्या कोअर बैठकीत विधानसभा निवडणुकीचा रोड मॅप ठरवण्यात आला. आता हाती आलेल्या माहितीनुसार, लवकरच एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश केला जाणार आहे. भाजपमध्ये घरवापसी होताच एकनाथ खडसेंच्या हाती मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती आहे.

लोकसभा निवडणुका होण्याआधीच खडसेंनी घरवापसी करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र अद्याप त्यांच्या भाजप प्रवेशाचा मर्हूत लागलेला नाहीये. आता हाती आलेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांच्यावर भाजपमध्ये मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती आहे

लोकसभा निवडणुकीच्या आधीच खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण रक्षा खडसे हे निवडून येतील तेव्हाच त्यांचा प्रवेश केला जाईल, असंही म्हटलं जात होतं. आता रक्षा खडसे यांचा विजय झाल्याने आता एकनाथ खडसेंना प्रवेश दिला जाणार आहे.पक्षात प्रवेश झाल्यानंतर खडसेंच्या हाती मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. कारण एकनाथ खडसे आधी भाजपमध्ये होते, त्यांना पक्ष वाढीसाठी मोठं काम केलं आहे. त्यांना भाजप आणि संघाची रणनीती माहिती आहे, त्यामुळे त्यांच्या हाती मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता  आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group