आधी टॅक्सीतून खाली उतरवलं अन् मग.....राष्ट्रवादीच्या  घडलं असं काही.....?
आधी टॅक्सीतून खाली उतरवलं अन् मग.....राष्ट्रवादीच्या घडलं असं काही.....?
img
Dipali Ghadwaje
मुंबईत एका आमदाराला चक्क टॅक्सी चालकाच्या मुजोरीचा सामना करावा लागला असल्याची घटना घडली आहे. मुजोर टॅक्सीचालकाने वादानंतर आमदार महोदयांना धमकावत टॅक्सीतून उतरवल्याचा प्रकार देखील समोर आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ,  राष्ट्रवादी काँग्रेसचे तुमसर मतदारसंघातील आमदार राजू कोरमोरे यांना मुंबईत हा अनुभव आला आहे. एका टॅक्सी चालकाने त्यांना धमकावल्याची घटना समोर आली आहे. कोरमोरे हे टॅक्सीने वाकोला जंक्शन सांताक्रूझ येथून आमदार निवास कुलाबा येथे जाण्यासाठी निघाले होते. 

यावेळी टोलचे पैसे देण्यावरून वाद झाल्याने टॅक्सी चालकाने आमदार राजू कोरमोरे यांना धमकावत टॅक्सीतून उतरवले. या प्रकरणी कोरमोरे यांनी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  

दरम्यान राजू कोरमोरे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात वाकोला पोलीस ठाण्यात ५०६ (२), भादंवीसह १७८(३) मोवाका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर याप्रकरणी सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group