मोठी बातमी : आचारसंहिता उद्यापासून लागणार? शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची आज शेवटची कॅबिनेट  बैठक
मोठी बातमी : आचारसंहिता उद्यापासून लागणार? शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची आज शेवटची कॅबिनेट बैठक
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा कधी होणार? आचारसंहिता कधी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातही हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहातील मंत्रिमंडळ बैठक सभागृहात होत आहे. आज होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही विद्यमान महायुती सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक असण्याची दाट शक्यता आहे. यानंतर विधानसभेची आचारसंहिता कोणत्याही क्षणाला लागू शकते.

निवडणूक आयोगाकडून उद्या पत्रकारपरिषद घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. 

महायुती सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक - 

राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्याआधी राज्यात निर्णायांचा सपाटा सुरु आहे. आज होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक सरकारसाठी महत्वाची आहे. आचारसंहिता लागण्याच्या आधी अनेक निर्णय आज सरकार घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महायुती सरकारची आजची शेवटची कॅबिनेट बैठक असेल. आजच्या कॅबिनेट बैठकीनंतर येणा-या २४ तासात कधीही आचारसंहिता लागू शकते, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला छगन भुजबळ, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, धनंजय मुंडे सह्याद्री अतिथीगृहवर दाखल झाले आहेत.

महाराष्ट्रातील विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्याआधी २८८ मतदारसंघात निवडणुका होतील, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते. महाराष्ट्र झारखंडमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मंगळवारी केली जाऊ शकते. त्यामुळे २४ तासांनंतर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात २८८ जागांवर तर झारखंडमध्ये ८१ जागांवर दोन टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. १५ नोव्हेंबर रोजी मतदान होण्याची शक्यता आहे. राज्यात पुढील २४ तासात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा करु शकते. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group