भाजपचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांचे निधन
भाजपचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांचे निधन
img
Dipali Ghadwaje
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांचे निधन झालं आहे. आज दुपारी १२ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशान भूमी येथे त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात येणार आहेत. 

पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांचं आज गुरुवारी सकाळी निधन झालं. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक होते. संघात काम करत असताना त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्याचे मोठे काम त्यांनी केले. त्यांच्यावर गेल्या ७ दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, गांगुर्डे यांची आज सकाळी प्राणज्योत मालवली.  विश्वास गांगुर्डे यांच्या पश्चात पत्नी, मुली आणि जावई असा परिवार आहे. 
pune | MLA | BJP |
इतर बातम्या
Join Whatsapp Group