विधानसभा अध्यक्षांचा मेल हॅक, राज्यापालांना ईमेल करुन 'त्या' आमदारांवर कारवाईची मागणी
विधानसभा अध्यक्षांचा मेल हॅक, राज्यापालांना ईमेल करुन 'त्या' आमदारांवर कारवाईची मागणी
img
Dipali Ghadwaje
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा अधिकृत मेल हॅक करण्यात आलाय. हॅकर्स एवढ्यावरच थांबला नसून त्याने या मेलवरुन थेट राज्यपालांनाच मेल केलाय. यामुळे एकच खळबळ उडाली. याप्रकरणी राहुल नार्वेकर यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.
 
नेमकं काय घडलं?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ई- मेल हॅक झाल्याची बातमी समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे राहुल नार्वेकर यांच्या इमेल आयडीवरून महाराष्ट्राच्या राज्यपालांना ईमेलही पाठवण्यात आला आहे.

राज्यपालांना पाठवलेल्या या ई- मेलमध्ये “काही आमदार जे सभागृहात नीट वागत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी," असा मजकूर लिहला असल्याचे सांगण्यात येत आहे. नार्वेकर यांना राज्यपाल कार्यालयाने विचारणा केली असता त्यांनी असा कोणताही ईमेल पाठवला नसल्याचे सांगितले, त्यानंतर हा प्रकार समोर आला.

दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी मुंबई पोलिसात धाव घेतली आहे. याप्रकरणी राहुल नार्वेकर यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group