अपात्रतेचा निकाल आज लागणार का?  ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांची निकालाआधी मोठी माहिती
अपात्रतेचा निकाल आज लागणार का? ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांची निकालाआधी मोठी माहिती
img
Dipali Ghadwaje
मागील दीड वर्षे चाललेला राज्यातील सत्तासंघर्षाचा घोळ आज (ता. १०) संपण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवायचे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना? याचा फैसला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आज करणार आहेत.

 मात्र निकाल नेमका किती वाजता लागणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसल्याने ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

याबाबत सोशल मिडीयावर पोस्ट करत असीम सरोदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज निर्णय देणे आवश्यक आहेच तर किती वाजता निर्णय जाहीर करणार हे कळवायला इतका उशीर का?? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

काय म्हणालेत वकील असीम सरोदे ?
"अपात्रतेबाबत काय निर्णय होणार? असा प्रश्न सर्वांना आहे. मात्र, आज निर्णय होणार का? असा प्रश्न मला पडतोय कारण अजूनही प्रकरणातील वकील म्हणून मला किंवा इतर वकिलांना Maharashtra Legislative Assembly सचिव यांच्याकडून इमेल आलेला नाही की राहुल नार्वेकर किती वाजता निर्णय जाहीर करणार?"

"कदाचित अगदी वेळेआधी कळवतील की किती वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात जमायचे आहे? पण जर 400 ते 500 पानांचा निर्णय तयार आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज निर्णय देणे आवश्यक आहेच तर किती वाजता निर्णय जाहीर करणार हे कळवायला इतका उशीर का??" ,असं प्रश्न सरोदेंनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या ज्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे त्यामध्ये शिंदे गटाच्या 16 तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांचा समावेश आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group