"आता मागे हटायच नाही, लढायचं", ईव्हीएमविरोधातील लढाई आता तीव्र होणार , शरद पवार नेमकं काय म्हणाले....
img
Dipali Ghadwaje
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुककीचा निकाल जाहीर झाला आहे. यात महायुतीला 230 जागांवर यश मिळवता आलं आहे. तर महाविकास आघाडीला मात्र 49 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. इतक्या जास्त जागा येण्याचा ना भाजपला अंदाज होता, ना एवढा दारूण पराभव होईल या महाविकास अंदाज होता.  

विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता महाविकास आघाडीतील पक्षाचे प्रमुख नेतेही ईव्हीएमविरोधातील भूमिकेवर एकमताने पुढे जात असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पराभूत आमदारांची  मुंबईत बैठक झाली. या बैठकीत पराभूत आमदारांनी निकालावर संशय व्यक्त करत ईव्हीएमच्या आकडेवारीवर आणि टक्केवारीवर संशय व्यक्त केला आहे.

त्यानंतर, पक्षप्रमुखांनी देखील ही बाब गांभीर्याने घेत ईव्हीएमविरोधात ठोस भूमिका घेण्याचं ठरवलं आह. त्यामुळे, ईव्हीएम विरोधातील लढाईसाठी विरोधकांच्या आक्रमक भूमिकेला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे 1 लाखांच्या मताधिक्याने विजयी झाले असूनही त्यांनी ईव्हीएमला प्रकर्षणाने विरोध दर्शवला. तर, शरद पवार  आणि उद्धव ठकारेंनीही मोठं आंदोलन उभं करण्याचं आवाहन केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत उमेदवारांनी केलेल्या तक्रारी संदर्भात एक वकिलांची टीम करण्याचा निर्णय पक्षाचे प्रमुख शरद पवारांनी घेतला आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून राज्यपातळीवर एक आणि केंद्रीय पातळीवर एक कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम गठित करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. शरद पवारांकडून केवळ आरोप करण्यापेक्षा ईव्हीएमबाबत जे आक्षेप आहेत किंवा निवडणूक प्रक्रियेत ज्या चुकीच्या बाबी घडल्या ते सर्व पुरावे गोळा करण्याच्या सूचना देखील उमेदवारांना देण्यात आल्या आहेत.  

दरम्यान उमेदवारांना 28 तारखे पर्यंत व्हीव्हीपॅट तपासणीसाठी वेळ असल्याने उमेदवारांनी तत्काळ व्हीव्हीपॅट तपासणी करावी अशीही सूचना सर्वच पराभूत उमेदवारांना बैठकीत करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील पत्राचा एक नमूना देखील शेअर करण्यात आला आहे.

राज्य पातळीवर ज्या प्रकारे या लढाईला सुरूवात करण्यात आली, त्याच प्रमाणे इंडिया आघाडी देखील लढाई लढणार असल्याची माहिती शरद पवारांनी उमेदवारांना दिली आहे. तर, आता मागे हटायच नाही, लढायचं, असा ऊर्जात्मक संदेशही शरद पवारांनी पराभूत उमेदवाराना दिला आहे.त्यामुळे, ईव्हीएमविरोधातील लढाई आता तीव्र होणार असल्याचे दिसून येते.

 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group