विधानसभा अध्यक्षांची सर्वात मोठी कारवाई; भाजपचे १५ आमदार तडकाफडकी निलंबित
विधानसभा अध्यक्षांची सर्वात मोठी कारवाई; भाजपचे १५ आमदार तडकाफडकी निलंबित
img
Dipali Ghadwaje
हिमाचल प्रदेशच्या राजकारणातून एक मोठी बातमी आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभा अध्यक्षांनी भाजपच्या तब्बल १५ आमदारांना निलंबित केलं आहे. सभागृहाच्या कामकाजादरम्यान गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्याचा आरोपाखाली विधानसभा अध्यक्षांनी ही कारवाई केली आहे. यामुळे हिमाचल प्रदेशच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.  सभागृहातून निलंबित करण्यात आलेल्या आमदारांमध्ये माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचाही समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला बुधवारपासून (ता. २८) शिमला येथे सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला. 

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष कुलदीप पठानिया यांनी विधानसभेचं कामकाज तातडीने स्थगित करत भाजप आमदारांना शांत राहण्याचं आवाहन केलं. मात्र, तरी देखील आमदारांनी वेलमध्ये येऊन घोषणाबाजी सुरूच ठेवली.

त्यामुळे सभापतींनी मार्शलला बोलावून आमदारांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश दिले. त्यामुळे भाजप आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत विधानसभा अध्यक्षांना धक्काबुक्की केली. इतकंच नाही, तर काही आमदारांनी सभागृहात सभापतींच्या खुर्चीवर कागद देखील फेकले. भाजप आमदार हंस राज आणि इतरांनी मेरा 'रंग दे बसंती' गाणे म्हणत आपला निषेध नोंदवला.



या आमदारांना केले निलंबित 

या घटनेची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्ष कुलदीप पठानिया यांनी विरोधीपक्षनेते आमदार जयराम ठाकूर, डॉ. विपिन सिंग परमार, रणधीर शर्मा, लोकेंद्र कुमार, विनोद कुमार, डॉ. हंस राज, डॉ. जनक राज, बलबीर वर्मा, त्रिलोक जामवाल, सुरेंद्र शौरी, दीप राज, पूर्णा ठाकूर, इंदरसिंग गांधी. दिलीप सिंग, ठाकूर आणि रणबीर सिंग यांना सभागृहाच्या कामकाजातून निलंबित केले.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group