काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला असून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन राजीनामा दिला. आज पुन्हा एकदा ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेणार असल्याची माहिती समजते.
अशोक चव्हाण आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीला पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. राजीनामा सोपवण्यासाठीच अशोक चव्हाण राहुल नार्वेकर यांच्या भेटीला पोहोचले होते अशी माहिती आहे.
शोक चव्हाण यांच्या राजीमाम्याची चर्चा असतानाच ते नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. ते मुंबईतच असून आज सकाळी त्यांनी विधानसभा अधक्ष नार्वेकर यांची भेट घेतली. त्यानंतर विविध चर्चाना उधाण आले. ते भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या राजकिय भूमिकेबाबत संशय निर्माण झाला आहे.
तर दुसऱ्या बाजूला मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयात हालचालींना वेग आला आहे. भाजप प्रदेश कार्यलय मध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा , मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार पराग अळवणी कार्यालय मध्ये दाखल झाले आहेत
गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचा एक गट फुटणार असल्याच्या चर्चा आहेत. तसंच अशोक चव्हाणही पक्षात नाराज असून वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात होतं. त्यातच अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला असून राज्यात मोठा राजकीय भूकंप आला आहे.