ससून रुग्णालय दर्जेदारच...! मंत्री हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले....
ससून रुग्णालय दर्जेदारच...! मंत्री हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले....
img
Dipali Ghadwaje
मुंबई :  पुण्यात अलीकडे अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या ससून रुग्णालयाबाबतच्या प्रश्नावर बोलताना वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी या रुग्णालयाचा दर्जा आजही अत्यंत चांगला असल्याचा दावा करून ज्यांची इच्छा आहे अशा सर्व आमदारांना त्या ठिकाणी नेऊ आणि हे दाखवून देऊ, असे विधानसभेत गुरुवारी सांगितले .  

दरम्यान ससून रुग्णालय परिसरात स्वतंत्र शासकीय कर्करोग रुग्णालय उभारण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ससून रुग्णालयाबाबत सदस्य भीमराव तापकीर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. मुश्रीफ यांनी या संदर्भात माहिती दिली.

या प्रश्नाच्या चर्चेत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, यशोमती ठाकूर, अनिल देशमुख, विश्वजितकदम, अशोक पवार यांनी भाग घेतला.

मुश्रीफ म्हणाले, ''ससून रुग्णालयात बेरियाट्रिक शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.  नवजात बालकांवरील उपचारांसाठी डॉक्टरांचीसंख्या पुरेशी असून उपचारांसाठी अतिदक्षता विभागात खाटांचीसंख्या वाढविण्यात येणार आहे. ससूनमधील सुविधा व सद्यः स्थितीबाबत पुणे शहरातील सर्व लोकप्रतिनिधींची धींबैठक घेऊन रुग्णालयाच्या पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात येईल. 

वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही 'एमपीएससी'मार्फत करण्यात येत आहे. गट 'क' मधील सर्व रिक्त पदे भरण्यात आली आहेत. गट 'ड' पदाची रिक्त पदे भरण्यासाठी कंत्राटी स्वरूपातस्थानिकस्तरावर जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत''.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयांमध्ये औषधे खरेदीचे अधिकार अधिष्ठाता यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे तातडीने औषधांची गरज असल्यास स्थानिक पातळीवर खरेदी करण्यात येत आहेत. औषधे न मिळाल्याने रुग्णांवर संकट येऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group