"तुम्हाला तुमचा पती अधिक आवडतो की दुसऱ्या महिलेचा?" , नेमकं काय म्हणाली अभिनेत्री प्रिती झिंटा
img
Dipali Ghadwaje
अभिनेत्री प्रिती झिंटाने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर आहे. पण प्रिती आजही कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता प्रितीने तिच्या राजकारणातील प्रवेशाबद्दल मोठं वक्तव्य करणार आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त प्रिती झिंटा आणि तिच्या राजकारणातील प्रवेशाबद्दल चर्चा रंगली आहे. नुकताच प्रिचीने एक्सवर PZchat सेशन ठेवलं. ज्यावर चाहत्यांनी अभिनेत्रीला अनेक प्रश्न विचारले.

PZchat सेशन दरम्यान एका चाहत्याने अभिनेत्रीला विचारलं, ‘काही महिन्यांपूर्वीचे ट्विट पाहिल्यानंतर असं वाटतं की तू भाजप पक्षात प्रवेश करणार?’ यावर प्रिती म्हणाली, ‘सोशल मीडियावरील लोकांची हीच समस्या आहे, आजकाल प्रत्येकजण खूपच जजमेंटल झाला आहे.’


पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मी आधी म्हटल्याप्रमाणे, मंदिरात किंवा महाकुंभात जाणं आणि मी कोण आहे आणि माझ्या ओळखीचा अभिमान बाळगणं म्हणजे राजकारणात येणं किंवा त्या कारणास्तव भाजपमध्ये सामील होणं असे नाही.’ सध्या अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत आहे.

भारताबद्दल असलेल्या प्रेमाबद्दल देखील अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘भारताबाहेर राहिल्याने मला माझ्या देशाचं खरं महत्त्व कळलं आहे आणि इतरांप्रमाणे, मीही आता भारताचं आणि भारतीय असलेल्या सर्व गोष्टींचं खूप कौतुक करतं.’

पुढे एका चाहत्यांना अभिनेत्रीला विचारलं, ‘पंजाब किंग्स सोडून दुसरा कोणता संघ तुला अधिक आवडतो.’ यावर अभिनेत्री म्हणाली, ‘हा एक उत्तम प्रश्न आहे. हा प्रश्न एका महिलेला विचारण्यासारखा आहे. तुम्हाला तुमचा पती अधिक आवडतो की दुसऱ्या महिलेचा? मी म्हणेल मला माझाच पती आवडतो. त्यामुळे आज आणि कायम पंजाब किंग्स माझ्या आवडीचा संघ असणार आहे.’ असं प्रिती म्हणाली.

अभिनेत्री  प्रिती आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.

सोशल मीडियावर प्रितीच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कामय सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group