मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फोनवरून चर्चा झाली. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार अंतरवालीत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी फोनवरून जरांगे आणि फडणवीसांचं बोलणं करून दिलं. तेव्हा या दोघांमध्ये मराठवाड्यातील नुकसानीवर चर्चा झाली.
काय म्हणाले ,मनोज जरांगे?
देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलताना आरक्षणावर चर्चा झाली नाही. शेतकरी चारी बाजूने संकटात सापडला, त्यांचे हाल होत आहेत. हा विषय महत्त्वाचा वाटला म्हणून त्या मुद्द्यावर चर्चा झाली , असं जरांगे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलताना आठ दिवसात मदत द्या, असं मी त्यांना बोललो. तुम्ही मदत देत असताना म्हणत असाल, आठ दिवसांनी देतो, दहा दिवसांनी देतो आणि देताना दोन वर्षांनी देतात. तर तुम्हाला शेतकरी पाडल्या शिवाय सोडत नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.