१५०० नव्हे तर आता ₹२५०० मिळणार ! 'या' योजनेतील लाभार्थ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
१५०० नव्हे तर आता ₹२५०० मिळणार ! 'या' योजनेतील लाभार्थ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
img
वैष्णवी सांगळे
राज्य सरकारने अनेक महत्वपूर्ण योजना राबवत अनेक गरजूंना अर्थसहाय्य पुरवले. ज्याचा अनेक गरजूंना मोठा लाभ होत आहे. आज राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक झाली. मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने प्रमाणे इतरही काही योजनांमध्ये १५०० रुपये अर्थसहाय्य्य दिले जाते. त्यापैकीच दोन योजनांमध्ये अर्थसहाय्य वाढवण्याचे बैठकीत ठरवले आहे. 

आज फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेत आता संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगाचे अर्थसहाय्य वाढवण्यात आले आहे. या योजनेत आता १ हजारांची वाढ करण्यात आली आहे. 

सुप्रीम कोर्टाकडून जामीन ! कुख्यात गुंड अरुण गवळी तब्ब्ल १८ वर्षांनंतर तुरुंगाबाहेर

संजय गांधी निराधार योजना
संजय गांधी निराधार योजनेत समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेत राज्यातील महिला, मागासवर्गीय समूदाय, आदिवासी आणि दुर्बल घटकांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जायचे. आता या योजनेच्या दिव्यांगांच्या निधीत वाढ करण्यात आली आहे. या योजनांमध्ये लाभार्थ्यांना दर महिन्याला अडीच हजार रुपये मिळणार आहे.

जीआरविरोधात छगन भुजबळ आक्रमक; जात बदलता येत नाही, आम्हीही...

श्रावणबाळ योजना
श्रावणबाळ योजनेतदेखील लाभार्थ्यांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. ६५ किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेत दारिद्र्यरेषेखालील किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न २१,००० रुपयांपेक्षा कमी आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेत आता लाभार्थ्यांना दर महिन्याला २५०० रुपये मिळणार आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group