'मला वाटलं......' ; विधानभवनाच्या लॉबीत देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंची भेट ; नेमकं काय घडलं?
'मला वाटलं......' ; विधानभवनाच्या लॉबीत देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंची भेट ; नेमकं काय घडलं?
img
DB
मुंबई : राज्यातील विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राजकीय आरोप प्रत्यारोपांची सत्र सुरु असतानाच यामध्ये काही अनपेक्षित भेटीगाठी आणि किस्सेही घडताना दिसत आहेत. जिथं राजकीय हेवेदावे दूर लोटत ही नेतेमंडळी अनोख्या मैत्रीपूर्ण नात्यानं एकमेकांसमोर येत आहेत. याचीच प्रचिती देणारी एक घटना समोर आली असून चर्चेचा विषय ठरली आहे.

पावसाळी अधिवेशनादरम्यान आणखी एका दिवसाच्या कामकाजादरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या वक्तव्यानं गदारोळ माजलेला असतानाच तिथं आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मात्र मिश्किल संवाद झाल्याचं पाहायला मिळालं. 

विधानभवन परिसरात नेमकं काय घडलं? 

विधीमंडळाच्या आवारात मंगळवारी आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आमनेसामने आल्याचं पहायला मिळालं. हे दोन्ही नेते समोरासमोर आले त्याचवेळी आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांना उद्देशून गमतीनं एक वक्तव्य केलं.

'मला वाटलं लिफ्टमध्ये चालला आहात...' असं आदित्य ठाकरे फडणवीसांना पाहताच म्हणाले आणि या एका लहानशा संवादानंतर तिथं खुद्द हे दोन्ही नेते आणि त्यांच्या आजुबाजूला असणारी मंडळीसुद्धा खळखळून हसल्याचं पाहायला मिळालं. 

विधानभवनाच्या लॉबी परिसरामध्ये झालेला हा संवाद सध्या बराच चर्चेत असून, राजकीय हेवेदावे सुरु असतानाच अधूनमधूनच होणारा हा संवाद राजकारणालाही वेगळीच कलाटणी देतोय असं म्हणणं गैर ठरणार नाही. 
 
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group