छगन भुजबळांना भाजपमध्ये घेतलं जाणार नाही ;
छगन भुजबळांना भाजपमध्ये घेतलं जाणार नाही ; "हे" कारण आले समोर
img
Dipali Ghadwaje
मुंबई : मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना स्थान न देण्यात आल्याने नाराजी नाट्याला सुरूवात झाली आहे. भुजबळांच्या नाराजी नाट्यात ते भाजपात प्रवेश करू शकतात अशीही चर्चा होती.  मात्र, आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , भुजबळांना तुर्तास तरी भाजपमध्ये घेतलं जाणार नसल्याचे सांगितले जात आहे. महायुतीत वाद नको म्हणून भुजबळांना भाजपात प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती आता समोर आली आहे. 

मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर तिन्ही पक्षातील अनेक नेते नाराज झाले असून, यात वरिष्ठ नेते असलेल्या भाजपच्या सुधीर मुनगंटीवार आणि राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

यानंतर नाराज भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. पत्ता कट करण्यात आलेल्या नेत्यांचं पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी एकीकडे होत आहे.

एक मोठा ओबीसी नेता म्हणून भुजबळांची ओखळ असून, भुजबळांना जर भाजपमध्ये घेतलं तर, अजितदादांच्या राष्ट्रवादीत नाराजीचा सूर उमटला जाऊ शकतो. त्यामुळे वादाची ठिणगी पडू शकते. हे वाद टाळण्यासाठी तुर्तास तरी भुजबळांना भाजपमध्ये तुर्तास तरी प्रवेश दिला जाणार नसल्याचे सांगितले जात आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group