मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर आता पर्यंत शिवसेनेचे आमदार, खासदार, सचिव , गटप्रमुख, आणि अन्य कार्यकर्ते हे शिवसेनेचे फोडले होते. मात्रा आता बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेसचे मोठे नेतेही प्रवेश करत आहेत.
आगामी विधानससभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या पक्ष स्थापनेपासून सोबत असलेले मनसेचा शिलेदार उमेश गोवारी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
पालघर जिल्ह्यात मनसेने दोन्ही आयात उमेदवार दिल्याने गोवारी नाराज होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी रात्री उशिरा पक्षप्रवेश केला.
उमेश गोवारी हे राज ठाकरेंच्या पक्ष स्थापनेपासून मनसेसोबत होते. डहाणू तालुकाप्रमुख आणि 2019 चे पालघर विधानसभेचे मनसेचे उमेदवार उमेश गोवारी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. 2019 चे विधानसभा निवडणुकीत पालघर विधानसभेत उमेश गोवारी पंधरा हजार मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर होते.
पालघर जिल्ह्यात मनसेने दोन्ही आयात उमेदवार दिल्याने गोवारी नाराज होते. उमेश गोवारी यांच्यासह डहाणू आणि तलासरीतील आठ ते दहा पदाधिकारी आणि बारापेक्षा अधिक ग्रामपंचायत सदस्यांच्या हाती धनुष्यबाण घेतले आहे. एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी रात्री उशिरा पक्षप्रवेश केला.