नाशिक नगरपरिषदेच्या निवडणुकीतून 'या' मोठ्या पक्षाची अचानक माघार
नाशिक नगरपरिषदेच्या निवडणुकीतून 'या' मोठ्या पक्षाची अचानक माघार
img
वैष्णवी सांगळे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु असताना नाशिकमध्ये मोठी घडामोड घडली आहे.  दरम्यान , नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीतून मनसेने माघार घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाशिक जिल्ह्यातील ११ नगरपरिषदेच्या निवडणुकीत एकही अधिकृत उमेदवार उभा राहणार नाही. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक न लढण्याच्या सूचना दिल्याची माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली. 

राज्यातल्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेसह महाविकास आघाडीने एकत्र येत चर्चा केली होती. तसेच नाशिकमध्ये मनसेसह महाविकास आघाडीने पत्रकार परिषद देखील घेतली होती. 

दरम्यान, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे नाशिक नगरपरिषदेची निवडणूक देखील एकत्र लढणार असल्याची चर्चा रंगली असताना आज राज ठाकरे यांनी अचानक नाशिक नगरपरिषदेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Nashik | MNS |
इतर बातम्या
Join Whatsapp Group