... तर आंदोलकांसाठी वानखेडे स्टेडियम द्या, मनसेची मागणी
... तर आंदोलकांसाठी वानखेडे स्टेडियम द्या, मनसेची मागणी
img
वैष्णवी सांगळे
राजधानी मुंबईत सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचे आंदोलन सुरू असून मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्याच पार्श्वभूमीवर विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. तर, राजकीय भूमिकांवरही मनोज जरांगे देखील आपली प्रतिक्रिया देत आहेत काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरक्षणावर प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घेरलं होतं. त्यावर मनोज जरांगेंनी राज ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला होता.

आता मनसे नेते बाळा नांदगांवकरांनी टीकेला प्रत्युत्तर दिलं.राज ठाकरें यांचा स्वभाव माहित आहे, ते स्पष्ट बोलतात, त्यांच्या पोटात एक ओठात एक नसते, असे म्हणत राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यवरुन मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिलीआंदोलकांना काहीही कमी पडलं जाऊ नये अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे. 

मी जरांगे पाटलांना तसेच आंदोलकांना विनंती करतो की कायदा आणि सुव्यवस्था बिघडली जाता कमा नये. कारण गणपतीत कोणालाही कसलीही अडचण व्हायला नको. सरकार कमी पडतंय असं नाही, तेही काम करतच आहे, असे बाळा नांदगांवकर म्हणाले. तसेच सरकारने लवकरात लवकर आंदोलनावर तोडगा काढावा. आंदोलकांसाठी आझाद मैदान कमी पडू लागलं असून वानखेडे स्टेडियम वापरण्यासाठी द्यावं, असे ते म्हणाले. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांचे वकील यांनी देखील ब्रेबॉन स्टेडियम आणि वानखेडे स्टेडियमवर जागा द्यावी आणि आंदोलकांना बाहेर न पडण्याचे निर्देश द्यावेत अशी कोर्टात मागणी केली. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group